मराठी सिनेमा साठी आंदोलन

मनसे च्या दणक्याने मिरा - भाईंदर मधील चित्रपट गृहात झळकले "दुनियादारी" चित्रपटाचे पोष्टर्स .

अवघ्या महाराष्ट्रात "दुनियादारी" या मराठी चित्रपट हाउस फुल्ल चालत असताना परप्रांतीय धार्जिण्या चित्रपट गृह मालकांनी मात्र मिरा - भाईंदर मध्ये हा चित्रपट लावला नव्हता . ही बाब मनसे च्या लक्ष्यात आल्यानंतर मनसे शहर अध्यक्ष् श्री प्रसाद सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकार्यांनी चित्रपट गृह व्यवस्थापनाला याचा जाब विचारला . या आंदोलना नंतर चित्रपट गृह व्यवस्थापना च्या मालकांनी हि चूक कबुल केली व लगेच "दुनियादारी" चे मोठे पोष्टर्स सर्वच चित्रपट गृहात झळकले . मिरा - भाईंदर मधील मराठी चित्रपट रसिकांनी मनसे च्या आंदोलनाचे कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर

मिरा-भाईंदर मनसे संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे.हे संकेतस्थळ जनतेसमोर सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या संकेतस्थळासाठी कार्यकर्त्यांची व नागरिकांची खूप दिवसा पासूनची अपेक्षा पूर्ण होत आहे आणि त्यांच्याच आग्रहाने हे संकेतस्थळ निर्माण झाले त्या सर्वांचा मी श्री प्रसाद सुर्वे अध्यक्ष मिरा-भाईंदर मनसे या नात्याने ऋणी आहे.

कार्यालय पत्ता
शॉप नं. ५, ओम साई पिंकी सोसायटी,
मेघा पार्टी हालच्या खाली,
जुना पेट्रोल पंप जवळ,
मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व).
जिल्हा - ठाणे - ४ ० १ १ ० ७
mnsmirabhayandar@gmail.com
Top

All Rights Reserved By | महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर

Designed By | Blossom Infotech