मतदार नोंदणी उपक्रम

राज्य निवडणूक आयोगाकडून १३ सप्टेंबर २०१३ ते १७ ऑक्टोबर २०१३ या कालावधीत नवीन मतदार नोंदणी व मतदार यादी दुरुस्ती मोहीम राबविण्यात येत आहे . या साठी मिरा - भाईंदर मनसे शहर अध्यक्ष् श्री प्रसाद सुर्वे यांनी आपल्या पदाधिकार्यांना घेऊन या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांची नावे नोंद करण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत . या मोहिमे मध्ये जास्तीत जास्त युवकांना सहभागी करून घेण्यात येत आहे . या उपक्रमा द्वारे मिरा - भाईंदर नागरिकांना नवीन मतदार नोंदणीसाठी फॉर्म ६ ,मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी फॉर्म ७ , मतदार यादीतील नाव दुरुस्त करण्यासाठी फॉर्म ७ व मतदार यादीतील नाव स्थलांतरित करण्यासाठी फॉर्म ८ अ असे सर्व प्रकारचे फॉर्म कसे भारावे यासाठी मतदारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या मोहिमे मुळे मतदार नोंदणी साठी कोणती कागद पत्रे लागतात नसतील तर पर्यायी कागद पत्रे कोणती अश्या अनेक सर्वसामान्याच्या समस्या आपोआप सुटण्यास मदत होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर

मिरा-भाईंदर मनसे संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे.हे संकेतस्थळ जनतेसमोर सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या संकेतस्थळासाठी कार्यकर्त्यांची व नागरिकांची खूप दिवसा पासूनची अपेक्षा पूर्ण होत आहे आणि त्यांच्याच आग्रहाने हे संकेतस्थळ निर्माण झाले त्या सर्वांचा मी श्री प्रसाद सुर्वे अध्यक्ष मिरा-भाईंदर मनसे या नात्याने ऋणी आहे.

कार्यालय पत्ता
शॉप नं. ५, ओम साई पिंकी सोसायटी,
मेघा पार्टी हालच्या खाली,
जुना पेट्रोल पंप जवळ,
मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व).
जिल्हा - ठाणे - ४ ० १ १ ० ७
mnsmirabhayandar@gmail.com
Top

All Rights Reserved By | महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर

Designed By | Blossom Infotech