आरोग्य विषयी आंदोलन

मिरा भाईंदर शहरमधे झपाट्याने वाढत असलेल्या डेंग्यू, मलेरिया यासारखे जीवघेण्या साथीच्या रोगाचे प्राबल्य वाढत असून त्यामुळे हजारो रुग्ण शहरातील विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.कित्येक जणांना मृत्यूच्या सामोरे जाव लागतं आज करोडो रुपयाचे बजेट असणाऱ्या महापालिकेेसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे.मिरा भाईंदर शहराच्या कर दात्याचे आरोग्य लक्षात घेता पं. भीमसेन जोशी व इंदिरा गांधी रुग्णालय सारख्या रुग्णालयात माफक दरात इलाज उपचार व चाचणी उपलब्ध व्हावे आणि महाराष्ट्र शासन अधिसूचनेनुसार डेंग्यूचे निदान करण्यासाठी प्रत्येकी ६०० रु आकारण्यात यावे असे असताना देखील शहरातील रुग्णालयात चाचणी व प्रयोग शाळेमधे सदर चाचणी करीता १५०० ते २००० रुपये देऊन नागरीकांची पिळवणूक होत आहे. तात्काळ थांबविण्यासाठी सदर अधिसूचनेची जाहिरात फलक महानगरपालिकेने शहरात लावावे सदर सुचनेचे अंमलबजावणी न करणाऱ्या रुग्णालय व प्रयोग शाळेचे परवाने नूतनीकरण करू नये अशी मागणी मनसेने केली आरोग्य विभागास निवेदन देताना मिरा भाईंदर नगरपालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त-संभाजी पानपट्टे व मिरा भाईंदर शहराचे शहर अध्यक्ष श्री. प्रसाद सुर्वे,उपशहर अध्यक्ष-हेमंत सावंत,मनपा कर्मचारी सेना-अमित भोसले, विभाग अध्यक्ष-दिनेश कानावजे, सय्यद अख्तर हुसैंन, अशोक येलवे, उपविभाग अध्यक्ष-सचिन पोपळे,बाबभाई, शाखा अध्यक्ष-गिरीश सोनी, रॉबर्ट डिसोझा, मारुती जाधव,संदीप चव्हाण, स्वप्नील गुरव,जाहिर शेख, कामरअली मिर्जा,अजय शेंडगे, अनिल जाधव,गणेश काकडे उपस्थित मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर

मिरा-भाईंदर मनसे संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे.हे संकेतस्थळ जनतेसमोर सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या संकेतस्थळासाठी कार्यकर्त्यांची व नागरिकांची खूप दिवसा पासूनची अपेक्षा पूर्ण होत आहे आणि त्यांच्याच आग्रहाने हे संकेतस्थळ निर्माण झाले त्या सर्वांचा मी श्री प्रसाद सुर्वे अध्यक्ष मिरा-भाईंदर मनसे या नात्याने ऋणी आहे.

कार्यालय पत्ता
शॉप नं. ५, ओम साई पिंकी सोसायटी,
मेघा पार्टी हालच्या खाली,
जुना पेट्रोल पंप जवळ,
मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व).
जिल्हा - ठाणे - ४ ० १ १ ० ७
mnsmirabhayandar@gmail.com
Top

All Rights Reserved By | महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा - भाईंदर

Designed By | Blossom Infotech